Success Password With Sandip Kale | Shivanand Mingire | Sakal Media |

2022-06-25 2

आपण ठरवलं तर आकाशाला गवसणी घालू शकतो, हे खरं आहे. एका शेतकऱ्यांनी ही म्हण खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरून दाखवली आहे. शिवानंद मीनगिरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. शेती कसणाऱ्या शिवानंद यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. त्यामध्ये ते पास झाले. मोठे अधिकारीही झाले.शिवानंद मीनगिरे सध्या जिल्हा समाजकल्याण अधिकारी परभणी, आणि सहाय्यक आयुक्त हिंगोली हे दोन पदभार सांभाळत आहेत. आई-वडील नसलेल्या शिवानंद यांना त्यांच्या भावाने आणि वहिनीने वाढविले, मोठं केलं. आपल्या सेवाभावी आणि शिस्तप्रिय स्वभावाने समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून अनेक सेवाभावी कार्यासाठी शिवानंद मराठवाड्यामध्ये सर्व परिचयाचे आहेत. एक शेतकरी ते अधिकारी, एक अधिकारी ते सेवाभावी उपक्रम राबविणारा क्रियाशील प्रशासक अशी ओळख निर्माण झालेल्या शिवानंद यांचा सर्वच प्रवास थक्क करणारा आहे. यशापयश आणि अडचणीला फाटे देत शिवानंद यांनी आत्तापर्यंत केलेला सगळा प्रवास हा निश्चितच उच्च ‘सक्सेस’ची पायरी चढणारा आहे. सकाळचे संपादक संदीप काळे शिवानंद मीनगिरे यांचा खास प्रवास ‘सक्सेस पासवर्ड’ या शोच्या माध्यमातून आपल्यासमोर आणला आहे. तेव्हा चला सहभागी होऊ या ‘सक्सेस पासवर्ड’ विथ संदीप काळे.